आमच्या सज्जातल्या छोटेखानी बागेबद्दल मी भरभरून लिहित असतो. आज आमच्या बागेतल्या फुलांतला मध पिण्यासाठी येणारा छोटासा पाहुणा मी आपल्याला दाखविणार आहे.
दोन इंच लांबीच्या या फूलचुख्याची शेपूट अर्धा इंच लांब असते. काही जणांचे पोट पांढरे शु्भ्र असते, तर काही जणांचे पिवळे असते. बाकीचे अंग आणि डोके करडे-काळे असते. सगळ्यांची चोच जवळ जवळ पाऊण इंच लांब आणि बारीक असते. हा पक्षी अगदी लाजाळू किंवा भित्रा असतो. फोटो काढण्यासाठी तो एका जागी क्षणभर टिकत नाही.कॅमेरा उचलला किंवा माणसाला आपल्याकडे नुसते बघताना पाहिले तरीही तो पटकन उडून जातो. तो उडतोही अगदी वार्याच्या वेगाने. त्याचा फोटो काढणे किती कठीण असते ते वर दाखविलेल्या चार फोटोंवरून सहज लक्षांत यावे. एकाही फोटोत तो पूर्णपणे दिसत नाही आहे. जास्वंद, बोगनवेल अशा कोणत्याही फुलावर तो बसतो, आपली चोच आंत खुपसतो, आणि आंतला मध पितो. त्याच्या येव्हढ्याशा वजनाने ते छोटेसे फूल गदागदा हलते. चिमणीचा आवाज 'चिव चिव' असा असतो. हा फूलचुखा पक्षी दर वेळी 'च्यू च्यू च्यू' असे तीनदा ओरडतो.
(Key words: Honey eater bird)