Thursday, June 23, 2011

Habits Never Die

मनुष्य प्राणी मोठा विचित्र असतो. जरी एकच परमेश्वर सर्व माणसांना बनवितो, तरी तो सर्वांनाच चांगले बनवीत नाही. चांगल्या माणसांचे महत्व जगाला कळावे म्हणून बहुधा तो वाईट माणसांना बनवीत असावा. काही वाईट माणसांना सज्जनांना त्रास देण्याची वाईट सवय असते. या सवयीमागे दोन गोष्टी असतात - एक म्हणजे मनांत असणारे सैतानाचे वास्तव्य आणि दुसरे म्हणजे वाईट गोष्टी करण्याचा असणारा किडा.

या विषाला उतारा नाही. ही वाईट सवय कधीही जात नाही. त्यांचा पापाचा घडा भरल्यावर परमेश्वराने अशा लोकांना परत बोलावून घेतले की मगच त्यांचा इतरांना होणारा उपद्रव थांबतो.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क