आटपाट नगर होतं. नगरात सुखसम्रुद्धी होती. खाण्यापिण्याची ददात नव्हती. माणसं दिवसा कामाला जात असत. सायंकाळी दमून भागून घरी येत. घरकाम उरकले की स्त्रिया मोकळ्या असत. त्या वेळात मुले शाळेत गेलेली असली की मोकळा वेळ मिळायचा त्या काळांत त्या निवडणे-टिपणे, शिवणकाम, भरतकाम-विणकाम, वगैरे करत असत. मुलाबाळांना उन्हाळी किंवा दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की मुले घरी असत. कधी ती दिवसभर खेळत. कधीकधी त्यांच्या माता त्यांना घेऊन बाहेर फिरायला जात असत.
अशाच एका दुपारी एक माता आपल्या दोन मुलांना घेऊन काही कामानिमित्त घराबाहेर पडली. मोठी मुलगी चौदा-पंधरा वर्षांची असेल. मुलगा चार एक वर्षांचा होता. रस्त्याने मार्गक्रमण करत असताना तो लहान मुलगा रस्त्यात बिकण्यासाठी दुकानांतून ठेवलेल्या प्रत्येक गमतीदार वस्तूसाठी ह्ट्ट धरत असे. कधी समजावून, कधी दम देऊन, तर बेळप्रसंगी त्याच्या पाठीत धपाटा घालून माऊली नको त्या वस्तू घरांत येऊ देत बव्हती. शेवटी मुलाचा शीतपेय पिण्याचा हट्ट तिच्याच्याने मोडवला नाही. ते थंडगार पेय पिऊन झाल्यावर थोड्या वेळाने मुलाला लघुशंका होऊ लागली. 'आता इथे रस्त्यांत कुठे?' असे त्या मातेने म्हटले. 'आत्ताच, खूप घाईची आहे' असे मुलाने जाहीर केले. प्रगत देशांत असतात तसे स्वच्छतेचे कायदे या नगरीतही होते, पण त्यांचे पालन तेव्हढ्या कठोरपणे होत नसे. शेवटी नाईलाजाने त्या माउलीने लेकीला काय करायचे त्याच्या सुचना दिल्या.
बाजूने जाणार्~या एका परदेशी पर्यटकाने हे द्रुष्य त्याच्या कॅमे~यात बंदिस्त केले. या मध्यमवर्गीय कुटुंबाकडे अंगरक्षक वगैरे ठेवण्यायेव्हढा पैसा नव्हता. नाहीतर सिनेमानटांप्रमाणे त्या माऊलीने अंगरक्षकाकरवी कॅमे~यात्ली चित्रफीत काढून घेतली असती, तो डिजिटल कॅमेरा असता तर त्यातले मेमरी कार्ड काढून घेतले असते आणि वर त्या पर्यटकाला थोडीफार मारहाणही करवली असती. तसे काही झाले नाही. पर्यटकाने तो फोटो लगेच मित्रमंडळींबरोबर व्हॉट्वसर वाटला (म्हणजे शेअर केला). लहान मूल नैसर्गिक क्रिया रस्त्याच्या बाजूला करत असताना त्याची मोठी बहीण त्याला मार्गदर्शन करते आणि त्या का्ळांत त्यांची माता आपला या दोघांबरोबर काहीही संबंध नाही असे दर्शवित तिसरीकडेच बघत उभी राहते हे त्या फोटोत स्पष्ट दिसत असल्यामुळे तो फोटो अल्पावधीतच अमाप प्रसिद्धीस पोहोचला (ज्या गोष्टीला आजकाल व्हायरल होणे असे म्हणतात). त्या काळात पुलित्झर बक्षिस अस्तित्वात नव्हते, नाहीतर त्या पर्यटकाचा पर्यटनाचा सर्व खर्च त्यातून निघाला असता.