राजा जरी नीतीमत्तेने राज्य चालवीत होता, तरी इतर लोक तसेच वागायला बांधील नव्हते. राजाचे काही सेवक आणि प्रजाजन सीमेपलीकडील शत्रूला सामील होऊन स्वार्थ साधीत होते. खोट्या चलनी नोटा सीमेपलिकडे छापून या मंडळींमार्फत राज्यात वापरात आणल्या जाऊ लागल्या. याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला.चलनातील खोट्या नोटा बाद करून टाकण्यासाठी राजाने २००५ पूर्वी छापलेल्या सर्व चलनी नोटा एक अध्यादेश काढून बाद केल्या. स्वतःकडे असलेल्या अशा सर्व नोटा प्रजाजनांनी बॅंकांत जाऊन बदलून ध्याव्या असे सांगितले, आणि तसे करण्यासाठी एका वर्षाहून जास्त काळाची मुदतही दिली. माणशी ५०००० रुपयांच्यावर नोटा बदल्यावयाच्या असल्या तर पॅन कार्डाची खरी प्रत जोडण्याचे बंधन घातले. २००५ नंतरच्या नोटा ओळखण्याची महत्वाची आणि सोपी खूण म्हणजे नोटेच्या पाठच्या बाजूला खालच्या कडेजवळ मध्यावर नोटेच्या छपाईचे साल छापलेले असे. घरात काळा पैसा जमवून ठेवलेल्या लोकांनी काय केले ते त्यांना आणि परमेश्वराला माहित.
राजाच्या प्रजेत एक पापभिरू ब्राम्हण होता. एके दिवशी चार घरांत पूजा सांगून ब्राम्हण जेवायच्या वेळी घरी जायला निघाला. उन्हाच्या वेळी चालण्याचा त्रास नको म्हणून ब्राम्हणाने बस पकडली. बसचा वाहक (ज्याला आजकाल कंडक्टर असे म्हणतात) आला. ब्राम्हणाने त्याला कनवटीची नोट काढून दिली. वाहकाने ब्राम्हणाला तिकिट दिले व उरलेले पैसे परत दिले. सवईप्रमाणे ब्राम्हणाने मिळालेल्या नोटा तपासून पाहिल्या. त्यांत एक मळकी, २००५ पूर्वीची नोट होती.
"ही नोट जरा बदलून द्या" ब्राम्हण नम्रपणे म्हणाला.
"काय झालय त्या नोटेला?" वाहकाने नित्याप्रमाणे उर्मट आवाजात विचारले.
"ती २००५ पूर्वीची आहे. तिच्या पाठी छपाईचे साल लिहिलेले नाही. राजाने या नोटा रद्द करून एक वर्ष होऊन गेलेले आहे" ब्राम्हण नम्रपणेच म्हणाला.
"तसे काही नाही" वाहकाने उर्मट आवाजात म्हटले.
"तसेच आहे. ही नोट आता चालणार नाही" ब्राम्हण म्हणाला.
"ती तुमची अडचण आहे. मला ही नोट चालतेय" वाहकाने जास्तच उर्मट आवाजात म्हटले.
"वर्तमानपत्रांत तसे आले होते. तुम्ही वर्तमानपत्र वाचावे."
"मला गरज नाही. ही तुमची अडचण आहे" वाहक बेफिकीरपणे म्हणाला. "माझी नाही."
"मी तुम्हाला चांगली नोट दिली होती. मी न चालणारी नोट घेणार नाही" ब्राम्हण नम्रपणे म्हणाला. "नोट बदलून द्या. तुम्हाला चालतेय ती नोट तुमच्याकडेच ठेवा."
बाहकाने दुसरी नोट दिली. "उगाच खिटपिट" तो इतर प्रवाशांना उद्देशून म्हणाला.
ब्राम्हणाने ही नोट तपासून पाहिली. घराचा बस थांबा आल्यावर तो उतरला. घरी आला. ब्राम्हणीने दिलेले पाणी पिऊन त्याने ही गोष्ट तिला सांगितली.
"तो वाहक इतका मूर्ख कसा?" ब्राम्हणाने पत्नीला विचारले.
"अहो, तो मूर्ख नाही, धूर्त आहे. रोज जमा होणारे पैसे त्याला बस आगारात गेल्यावर जमा करावे लागतात. २००५ पूर्वीच्या नोटा तिथे घेणार नाहीत. तेवढे पैसे त्याच्या पगारातून कापून घेणार. ही चूक त्याला परवडणारी नाही. तु्म्ही साधे दिसता म्हणून तो ती नोट खपवायला बघत होता असणार."