Thursday, May 28, 2015

परमेश्वरावर भिस्त

आटपाटनगरात ग्राहकांना दिवस-रात्र केव्हाही पैसे काढता यावे यासाठी एटीएम असत. मशीन तोडून कोणी पैसे चोरू नये, मशीनच चोरू नये किंवा ग्राहकांना लुटू नये म्हणून एटीएम मध्ये एक सुरक्षा रक्षक ठेवत. हे सुरक्षा रक्षक बहुतेकदा राजाने नेमलेले नसत, तर खासगी कंत्राटदाराने पुरवलेले असत. अशाच एका एटीएमच्या सुरक्षाक्षारक्षकाची ही गोष्ट आहे. सुरक्षाक्षक व्रुद्ध झाला होता. गात्र शिथिल झाली होती. परमेश्वराने परत बोलवेपर्यंत त्यानेच दिलेली पोटाची खळगी भरली पाहिजे म्हणून बिचारा मिळेल ते काम करत असे. सुरक्षेचे खासगी कंत्राटदार कमी पगारात का होईना, आपल्यासारख्या व्रुध्ढांना काम देतात हे समजल्यावर तो अशा एका एटीएममध्ये कामाला लागला. तिथे झाडलोट करणे, वातानुकूलन यंत्राचे डब्यांत जमलेले पाणी समोरच्या झाडाच्या मुळात नेऊन ओतणे, आणि इतर वेळी एका खुर्चीवर बसणे असे त्याच्या कामाचे स्वरूप होते. उन्हाळा असह्य झाला आणि आत ग्राहक नसला तर तो एटीएमच्या थंड हवेत जाऊन बसत असे.


पांढरे शुभ्र केस (पिवळा बाण), तोळामासा प्रक्रुती, पाय दुखतात म्हणून पायताणे (काळा बाण) काढून पाय खुर्चीवर घेऊन निवांत बसलेल्या रक्षकाला पाहून चोर घाबरत. या माणसाला कुंग फू किंवा तत्सम मार्शल आर्ट येत असणार असे त्यांना वाटत असे. नाहीतर एक कानपटात मारली तर पाणी मागणार नाही अशा माणसाला एटीएममध्ये सुरक्षेसाठी कोण ठेवणार असे त्यांना वाटत असे. चोरांची मानसिकता ओळखणे हे त्या कंत्राटदाराच्या धंद्या्च्या यशाचे गमक असावे. कदाचित ज्यांना कोणी नसतो त्यांना देव असतो या सूत्राप्रमाणे म्हातारा आणि एटीएम या दोन्हींची काळ्जी परमेश्वर घेत असावा.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क