Sunday, May 10, 2015

Cyberflattery

सायबरफ्लॅटरी असा शब्द शब्दकोशामध्ये नाही. पुढेमागे तो येईल याची मला खात्री आहे. ते बघायला मी असेन किंवा नसेन. पण माझे तरुण वाचक नक्कीच असतील. ज्यांना सायबरक्राईम म्हणजे काय ते माहीत आहे त्यांना सायबरफ्लॅटरी उआ शब्दाचा अर्थ समजायला जड जाऊ नये. इंटरनेटच्या मायाजालात घडणा~या गुन्ह्यांना सायबरक्राईम असे म्हणतात. तशाच प्रकारे इंटरनेटच्या मायाजालाच्या माध्यमातून होणा~या खोट्या स्तुतीला सायबरफ्लॅटरी म्हणता येईल. एखाद्या व्यक्तीच्या गुणांचे स्वार्थ साधण्यासाठी खोटे कौतुक करणे हे काही माणसांचे वर्तन सर्व संवेदनाशील माणसांना जाणवतेच. जे उथळ स्वभावाचे असतात त्यांना आपली खोटी स्तुती केली जात आहे हे कळत नाही, आणि ते त्यामुळे आनंदून जातात. अशा लोकांना खुशमस्करे असे म्हणत असत. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आजकाल व्यक्तीशः भेटून खोटी स्तुती करावी लागत नाही. सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर ही गोष्ट सहजपणे आणि सफाईने करता येते, आणि ती मोठ्या प्रमाणावर होते आहे.
गूगलच्या ब्लॉगवर वाचलेला एखादा लेख आवडला तर त्याला १+ करण्याची सोय गूगलने केलेली आहे. मग त्या वाचकाच्या ग्रूपमधल्या सर्वांना त्या लेखाबद्दल समजते आणि ते सुद्धा तो लेख वाचतात. पण केवळ एखाद्या ब्लॉगरला खू्श करण्यासाठी जर त्याच्या लेखाला १+ केले,  तर त्याला सायबरफ्लॅटरी म्हणावे लागेल. शिक्षक आणि परीक्षक यांना या पद्धतीने खूश करण्याचे प्रकार नित्य अनुभवाला येतात. परीक्षाघोऊन गेली की १+ होणे तत्काळ बंद होते. शिक्षकाला ही गोष्ट समजत नसेल असे समजणे अपरिपक्वतेचे लक्षण होय. फेसबूकवर हीच गोष्ट एखाद्याचे पोस्ट लाईक करून केली जाते. ट्विटरवर एखाद्याचे पोस्ट रिट्वीट करून हे साध्य करता येते. माझ्यावर जेव्हाजेव्हा हा प्रयोग होतो तेव्हातेव्हा मला एकाच गोष्टीचे दुःख होते, ती म्हणजे त्या व्यक्तीला मी समजलोच नाही.


प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क