एस्.व्ही.जी. (SVG) हा डिजिटल चित्रांचा एक नवा प्रकार आहे. यांत स्केलेबल व्हेक्टर ग्राफिक असते. ते रेखाचित्र असू शकते, किंवा रंग भरलेले चित्रही असू शकते. या प्रकारचे चित्र मोठे केले तरीही ते धूसर किंवा अंधुक होत नाही. येथे मी आपोआप रेखाटले जाणारे एक एस्.व्ही.जी ग्राफिक अँनिमेशन दाखविले आहे. 'draw' असे लिहिलेल्या बटणावर क्लिक करा आणि पहा.
आयुष्यात अनेक प्रकारची माणसे भेटली आणि अनेक प्रकारचे प्रसंग घडले. काही चांगले, काही वाईट. त्यांतल्या लक्षात रहातील अशा व्यक्ती आणि घटना येथे मांडल्या आहेत. समोर येणा~या अडचणींतून मार्ग काढतांना बरंच काही शिकायला मिळालं. तेही लिहिलं आहे. त्यांतून माझा स्वतःचा मोठेपणा दाखविण्याचा हेतू बिलकूल नाही. इंटरनेटवर असलेली माहिती जगाच्या पाठीवर असणा~या कोणालाही घेता येते म्हणून हा सगळा प्रपंच. त्यांतले बरे वाटेल ते घ्या. जर त्यातून कोणाचा फायदा झाला तर हा सगळा खटाटोप सार्थकी लागला असे मला वाटेल.