आटपाट नगरच्या राजाच्या प्रशासनात, रुग्णालयांत, विद्यालयांत आणि साधारणपणे सर्वच क्षेत्रांत एक अजब गोष्ट दिसून येत असे. कदाचित तो मनुष्यस्वभावाचा स्थायीभाव असावा आणि आटपाट नगराशी किंवा त्याच्या राजाशी त्याचा काही संबंध नसावा. उदाहरणार्थ रुग्णालयाचे प्रमुख वैद्य हे विविध विभागांच्या प्रमुखांना कधी अनुल्लेखाने मारत असत, तर कधी अनुद्गाराने मारत असत. सर्व रुग्णालयांचे प्रमुख संचालक रुग्णालयांच्या प्रमुख वैद्यांना कस्पटासमान वागवीत असत. प्रशासनाचे प्रमुख अधिकारी सर्व प्रमुख वैद्य आणि संचालक यांना सभेसाठी बोलावून तासन् तास तिष्ठत ठेवत असत, आणि त्यांच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत असत. या गोष्टी अशाच व्हायच्या असे ग्रुहीत धरूनच रोजचे कामकाज चालत असे.
तर एकदा प्रमुख प्रशासकांच्या छातीत एका पहाटे अकस्मात दुखू लागले. त्यांनी प्रमुख वैद्यांना दूरध्वनी करून आपण रुग्णालयांत पहाटे येतो असे कळविले. प्रमुख वैद्यांनी प्रमुख ह्रुदयरोगतज्ज्ञांना पहाटे आपल्या दालनांत हजर रहा असे फर्मावले. राजवैद्य तेथून आपल्या विभागाकडे चालले होते तेव्हढ्यात प्रमुख प्रशासक आणि प्रमुख वैद्य त्यांच्या दालनांतून एकत्र बाहेर पडले. प्रमुख ह्रुदयरोगतज्ज्ञ आंग्लदेशांत घालतात तसा 'थ्री पीस सूट' घालून आणि टाय लावून बाहेर उभे होते. त्यांच्या समोरून प्रमुख प्रशासक आणि प्रमुख वैद्य प्रमुख प्रशासकांच्या रथांत जाऊन बसले. 'ह्रुदयरोगविभागांत या' असा त्यांना आदेश देऊन रथ त्यांना पाठी ठेवून निघून गेला. राजवैद्य हा प्रसंग अचंभित होऊन पहात उभे होते. रथांत भरपूर जागा असूनही आणि ह्रुदयरोगतज्ज्ञांशिवाय उपचार सुरू होणार नाहीत याची पूर्ण कल्पना असूनही त्यांना बरोबर घेतले नाही, यामुळे अपमानित झालेल्या ह्रुदयरोगतज्ज्ञांनी राजवैद्यांकडे पाहिले, त्यांची नजर चुकविली आणि प्रमुख प्रशासकांना तपासण्यासठी आपल्या विभागाकदे चालत चालत निघाले.
का लांतराने राज्यातल्या खूप उपद्रवमूल्य असणा~या एका राजकारणी नेत्याने प्रमुख प्रशासक, प्रमुख संचालक, सर्व प्रमुख वैद्य आणि सर्व विभागांच्या प्रमुखांना सभेसाठी बोलावले. सभेच्या वेळी मोठे भाषण केले. नेहमीच्या सवयीप्रमाणे प्रमुख संचालक प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडू लागले तेव्हा त्याने प्रथम त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले, नंतर त्यांचा जुन्या चुका उद्ध्रुत केल्या, आणि शेवटी प्रमुख संचालक मध्ये मध्ये बोलायचे थांबेनात असे पाहिल्यावर 'मी भाषण करत असताना मध्ये मध्ये बोलू नका' असे स्पष्त सांगितले. सर्वांचा वारंवार आणि ब~याच वेळा अकारण अपमान करणा~या प्रमुख संचालकांचा अपमान त्यांच्या हाताखालच्या सर्वांनी पाहिला, आणि तो त्यांनी सस्मित मुद्रेने गिळला हेही पाहिले.
"वारा येईल तसा पाठीचा कणा ताठ आणि लवचिक कसा होतो पहा" असे कोणा वैद्याने म्हटलेले राजवैद्यांनी ऐकले.