दिनांक २७-२८ सप्टेंबर २०१५ रोजी आपल्याकडे सुपरमूनचे दर्शन झाले. माझ्याकडे आकाशातल्या ग्रहतार्यांचे छायाचित्र घेऊ शकेल अशी दुर्बीण आणि कॅमेरा नाही. मी आयपॅडवर घेतलेले छायाचित्र खाली दाखविले आहे. दुर्बिणीतून घेतलेल्या छायाचित्रायेव्हढा हा चंद्र मोठा दिसत नाहीये. पण टेकडीवर उभे राहून सुपरमून पहाणार्या माणसांच्या छायाचित्रात अर्धेअधिक छायाचित्र व्यापेल येव्हढा मोठा चंद्र दिसतो त्यांत काहीतरी गोलमाल असावे असा माझा अंदाज आहे. माझ्या छायाचित्रात दिसणार्या दुरवरच्या इमारतींच्या तुलनेत चंद्र किती मोठा दिसतो आहे ते पाहिले की त्याच्या आकाराची कल्पना यावी.
काल पौर्णिमा होती. काल मी त्याच ठिकाणाहून चंद्राचे काढलेले छायाचित्र खाली दाखविले आहे. मागच्या छायाचित्रापेक्षा चंद्र आकाशात जास्त वर आलेला आहे. पण आकारात तो मागच्या सुपरमूनपेक्षा काही लहान दिसत नाहीये. सुपरमून ही खरी गोष्ट आहे की आख्यायिका?
(Keyword: Supermoon True or Myth?)