आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयात आरोग्य विद्यापीठाकडून आलेले एक परिपत्रक राजवैद्यांकडे पोहोचले. ते वाचून झाल्यावर त्यांनी ते इतर वैद्यांना वाचण्यासाठी दिले.
"शेवटी विद्यापीठाने या विषयाला हात घातला तर" एक वरिष्ठ वैद्य म्हणाले.
"कोणीतरी दट्ट्या लावला असेल" दुसरे एक वैद्य म्हणाले. "उच्चपदस्थांना रुग्णालयांत काय चालते ते इतके दिवस माहीत नव्हते काय? आपल्यासारखेच तेही वैद्य. एक दिवस रोजचे काम सोडून विद्यापीठांत पोहोचले म्हणून पूर्वीच्या गोष्टी विसरायला कशा होतील?"
"मी राजवैद्य झालो तेव्हा सर्व वैद्यांना बोलावून स्पष्ट सांगितले होते, की पदव्युत्तर शिक्षण घेणार्या निवासी वैद्यांना स्वतःची खाजगी कामे करायला लावू नका. तरीही त्यांनी तसे करणे सोडले नाही" राजवैद्य म्हणाले. "मी सद्वर्तनाचे उदाहरण घालून दिले त्याचाही काही उपयोग झाला नाही. आता विद्यापीठाकडून तसे परिपत्रक आले म्हणून ही मंडळी आपले वर्तन सुधारतील असे मला तरी वाटत नाही."
"हो. विद्यार्थ्यांनी तक्रार केली तरच विद्यापीठ कारवाई करेल. तक्रार करायला विद्यार्थी भितात" एक वैद्य म्हणाल्या. "ते खवीस वैद्य आहेत ते आपल्या खोलीतली शीतपेटी विद्यार्थ्यांना साफ करायला लावतात. आपल्या व्याख्यानाच्या स्लाईड्स त्यांच्याकडून करून घेतात, आणि व्याख्यानाच्या वेळी त्यांनाच स्लाईड्स दाखवायचे काम करायला घेऊन जातात. त्यांची बॅग त्यांच्या रथांत नेऊन ठेवायला विद्यार्थ्यांना लावलेलेही मी पाहिले आहे."
राजवैद्यांनीही ते पाहिले होते. ते काही बोलले नाहीत. विद्यार्थी तक्रार करत नाहीत तोपर्यंत ते काही करू शकत नव्हते.
"त्या दुसर्या वैद्य आहेत त्या आपल्या मुलीचा जेवणाचा डबा गरम करून आपल्या खोलीत नेऊन ठेवायचे काम विद्यार्थ्यांना करायला लावतात. स्वतःच्या खाजगी रुग्णांना घेऊन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी तपासण्यांसाठी पाठवितात. दुसर्या रुग्णालयांत जाऊन स्वतःची खाजगी कामे करून यायला सांगतात."
राजवैद्यांना हेही माहीत होते. त्यांनी मान हलविली.
"शेजारच्या घाटावरच्या एका राज्यात तर वरिष्ट वैद्य विद्यार्थ्यांना बाजारात जाऊन भाजी आणायला सांगतात आणि आपल्या मुलांना शाळेत नेऊन सोडणे आणि परत आणणे ही कामेही देतात" तिसरे एक वैद्य म्हणाले. "इथले विद्यार्थी ही कामे करत नाहीत म्हणून पालिकेच्या दुसर्या रुग्णालयाचे राजवैद्य माझ्याकडे खंत व्यक्त करीत होते."
म्हणजे पोलीस किंवा सैन्यदलात अधिकारी हाताखालच्या शिपायांना स्वतःची असली कामे सरकरी पगरांत करायला लावतात असे वर्तमानपत्रांत वाचायला मिळते त्यांतलाच हा प्रकार झाला म्हणायचा" दुसरे वरिष्ठ वैद्य म्हणाले.
"आता विद्यापीठ अशक्य ते शक्य करून दाखविते का ते बघूया" राजवैद्य म्हणाले.