आटपाट नगरच्या राजाच्या सर्व कर्मचार्यांना मराठी भाषेची १०वीची परीक्षा उत्तीर्ण होणे प्रशासनाने सक्तीचे केले होते. राज्यातल्या जनतेच्या भाषेत सर्व व्यवहार झाले तर जनतेचा फायदा होईल असा त्यामागचा विचार होता. विचार व नियम स्तुत्य होते याबद्दल काहीच शंका असण्याचे कारण नव्हते. नियम राजाच्या रुग्णालयांत नेमणूक होण्याची इच्छा बाळगणार्या वैद्यांनाही लागू होता. जर १०वीच्या परीक्षेत मराठी विषय घेतलेला नसला, तर स्वतंत्रपणे तेव्हढ्या विषयाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय नोकरी मिळत नसे. अर्थात परीक्षा उत्तीर्ण झाली म्हणून मराठी समजत असे अशातली गोष्ट नव्हती.
उत्तर भारतवर्षातील अशाच एका अमराठी भाषिक वैद्याने राजाच्या रुग्णालयात नोकरी मिळवली. पण या वैद्यांना मरठीचा ओ की ठो समजत नसे. रुग्णांबरोबर संवाद साधण्यासाठी त्यांना नेहमी दुभाषा लागत असे. राजवैद्यांनी या वैद्यांना एकदा स्पष्ट विचारले की त्यांनी मराठीची परीक्षा खरोखरच उत्तीर्ण केली होती का, तर त्यांनी उत्तरादाखल आपली त्या परीक्षेची गुणपत्रिकाच दाखविली.
"मग आपल्याला आम्ही बोलतो ते समजत का नाही?" राजवैद्यांनी विचारले.
"मी गेल्या पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहून या वर्षी कोणते प्रस्न विचारले जाणार ते ठरवले, आणि त्यांची उत्तरे पाठ केली. त्यामुळे मी पास झाले" वैद्यबाई आंग्लभाषेत म्हणाल्या.
राजवैद्यांनी मनांतल्या मनांत कपाळाला हात लावला.
वैद्यबाईंची कालक्रमणा दुभाषाच्या मदतीने सुरूच राहिली. कालांतराने त्यांनी नियमाप्रमाणे मराठी भाषेत रजेसाठी अर्ज केला. तो अर्ज वाचून राजवैद्यांना हसावे की रडावे तेच कळेना.
"मला दिनांक ९६-९२-२०९५ ला रजा द्यावी. त्या काळात माझी दुट्टी वैद्य अमुक-तमुक करतील."
बाईंना १ आणि ९ मधला फरक समजत नसावा, त्यामुळे त्यांनी १६-१२-२०१५ ऐवजी ९६-९२-२०९५ असे लिहिले असावे हे राजवैद्यांच्या लक्षांत आले. पण दुट्टी म्हणजे काय ते मात्र त्यांना समजले नाही. त्यांनी वैद्यबाईंना बोलावून घेतले आणि दुट्टी या शब्दावर बोट ठेवून ते काय आहे असे विचारले.
"ड्यूटी (Duty)" असे वैद्यबाईंनी सांगितले. येव्हढे साधे मराठी राजवैद्यांना स्वतः मराठी भाषिक असून समजू नये याचे आश्चर्य त्यांच्या चेहेर्यावर स्पष्ट दिसते होते.
"आपण लिहिलेल्या शब्दाचा उच्चार ड्युटी असा न होता दुट्टी असा होतो" राजवैद्य संयमाने म्हणाले. "दुट्टी असा शब्द मराठी भाषेत नाही. आपण रजेचा अर्ज नीट शु्द्ध मराठी भाषेत लिहून देता की आहे त्याच स्थितीत महाराजांकडे पाठवू?"
अर्ज दुरुस्त करून आणते असे सांगून वैद्यबाई गेल्या. दुसर्या दिवशी अर्ज परत आला.
"अरे वा, इतक्या सुवाच्य अक्षरांत आणि अतिशय शुद्ध भाषेत अर्ज आलाय. त्यांनी नक्कीच कोणाकडून तरी तो भरून घेतला असणार" राजवैद्य म्हणाले.
"मीच भरून दिला" अर्ज घेऊन आलेल्या रुग्णालयाच्या लिपिक-टंकलेखिका म्हणाल्या. "त्यांनी खूपदा सांगूनही इतक्या चुका केल्या की शेवटी स्वतःच अर्ज भरून देणे जास्त बरे हे माझ्या लक्षांत आले."
राजवैद्य हंसले.