आटपाट नगरात सुरुवातीला बैठी घरे होती. पण लोकसंख्या वाढू लागली त्या प्रमाणात राज्याचे क्षेत्रफळ काही वाढेना. शेवटी अनेक मजली घरे बांधावी लागली. त्यामुळे नवेच प्रश्न निर्माण झाले. घरे जमिनीच्या जवळ होती तेव्हा मलनिःसारण करणे सोपे होते. ते जमिनीत सोडून दिले की काम होत असे. पण वरच्या मजल्यावरच्या घरांचे मलनिःसारण कसे करायचे? मैला डोक्यावरून वाहून नेण्यास तर राजाने कायदा करून बंदी घातली होती. मग त्याच्या अभियांत्रिकी विभागाने शक्कल लढविली. त्यांनी सहा इंची नळ्या बसवून मल वाहून नेण्याची तजवीज केली. सर्व प्रजाजन आनंदाने नांदू लागले.अभियंत्यांचे प्लंबिंग कधीकधी ढिले पडत असे. मग जोडलेल्या नळ्यांच्या सांध्यांतून आत असणारा द्राव बाहेर वहात असे. समजूतदार नागरिक प्लंबरला बोलावून सांधे जोडून धेत असत आणि आयुष्य पुढे चालू रहात असे.
नगरात एक साध्या आणि सरळ स्वभावाचे गुरुजी रहात असत. ते कोणाच्या अध्यातमध्यात नसत. गुरुजी वरच्या मजल्यावर रहात असत. त्याच इमारतीत पहिल्या मजल्यावर एक तामस व्रुत्तीचा ब्राम्हण रहात असे. ब्राम्हण स्वतःच्या हक्कांबाबत अतिसजग आणि चिड्खोर होता. जरा काही मनाविरुद्ध झाले की तो हमरातुमरीवर येत असे. एक दिवस ब्राम्हणाच्या घरातून बाहेर जाणा~या नळीचा सांधा ढिला पडला. ब्राम्हणाला काही हे समजले नाही, कारण वेळ रात्रीची होती, आणि अंधारात घराबाहेर काय घडते आहे हे त्याला समजण्याचा काही मार्ग नव्हता. अकस्मात त्याचा आंतर-दूरध्वनी खणाणला. रात्री पावणेबारा वाजता दूरध्वनी खणाणल्यावर ब्राम्हणाच्या ह्रुदयांत धस्स झाले. आंतर-दूरध्वनी वाजतॉ आहे म्हणजे इमारतीतीलच कोणीतरी दूरध्वनीवर असणार असे त्याच्या मनात आले.
"हॅलो" गुरुजींनी आंतर-दूरध्वनीच्या मौखिकेत म्हटले.
"तुम्ही खिडकीतून बाहेर पाणी ओतता आहात काय?" असा ब्राम्हणाचा उच्चरवातला उर्मट आवाज आला. "ते आमच्या घरात येते आहे."
मागे एकदा खिडकीच्या काचा धुताना याच मुद्द्यावरून ब्राम्हणाने मोठे भांडण केले होते ते गुरुजींना आठवले. तसेच एकदा पाऊन आला तेव्हा तुम्हीच पाणी ओतत आहात असा आरोप ब्राम्हणाच्या मातोश्रींनी करून भांडण करण्यास सुरुवात केली होती तेही त्यांना स्मरले.
"नाही बुवा" गुरुजी म्हणाले.
"मग वरून पाणी येतेय कोठून" ब्राम्हणाने विचारले.
"आमच्या वरच्या किंवा खालच्या मजल्यावरून येत असेल. आपण समोरच्या इमारतीच्या गच्चीवर जाऊन ते पहावे. आता मला बोलत बसायला वेळ नाही. उद्या सकाळी मुलांना शिकवायला जायचे आहे" असे म्हणून गुरुजींनी दूरध्वनी बंद केला.
दुस~या दिवशी हे खिडकीतून ओतलेले पाणी नसून निःसारणाचे पाणी आहे हे ब्राम्हणाला समजले. त्याने इमारतीच्या कचेरीत जाऊन गळणा~या नलिकेची दुरुस्ती युद्धपातळीवर करून घेतली. गुरुजींना मात्र त्याने अक्षरानेही काय घडले ते सांगितले नाही. ते त्यांना दुरुस्तीचे काम होताना पाहूनच समजले.
दोन वर्षे गेली. गुरुजींच्या घराच्या निःसारणाच्या नलिकेच्या सांध्यावर पिंपळाचे झाड उगवले. जॅक आणि बीनस्टॉक या गोष्टीतल्या झाडासारखे ते वेगाने फोफावू लागले. गुरुजींच्या घरात लावलेली तुळस खतपाण्याचे लाड करूनही खुरटलेली होती, आणि घराबाहेरच्या नलिकेवर वाढणारे हे झाड असे वेगाने वाढत होते, हे कसे ते गुरुजींना समजेना.
"अहो, त्या नलिकेच्या सांध्यातून त्या झाडाच्या मुळांना सोनखत मिळत असणार. आता लवकरच तो सांधा निखळेल, आणि मग पूर्वीसारखे भांडण होईल. त्यापूर्वीच झाड काढून घ्या" असे गुरुजींच्या पत्नीने म्हटले.
गुरुजी इमारतीच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी तक्रार नोंदविली. एक आठवडा गेला, पण झाड काढायला कोणी आले नाही. झाड गुरुजींच्या सज्जापर्यंत पोहोचले. आता ब्राम्हण त्या गोष्टीतल्या जॅकसारखा झाडावर चढून आपल्या घरी भांडण करायला येईल अशी त्यांना भिती वाटू लागली. ते परत इमारतीच्या कार्यालयात पोहोचले. सचिवाने त्यांचे स्वागत केले. बसवून घेतले. गुरुजींनी आपली व्यथा त्याला सांगितली.
"ते झाड काढून घेता येईल का?" गुरुजींनी नम्रपणे विचारले.
"गुरुजी, माझे हात बांधलेले आहेत. कार्यकारिणी बदलते आहे. आज मी या कामाचा खर्च केला तर नवे कार्यकारी मंडळ आक्षेप घेईल."
"नको नको. राहू दे" गुरुजी म्हणाले. "उगाच त्यातून नवे वाद निर्माण व्हायला नकोत. तुमच्या डोक्याला उगाच त्रास होईल. आपण थांबूया. नवी कार्यकारिणी कार्यान्वित होण्यापूर्वी जर नलिकेचा सांधा झाडाच्या मुळांनी तोडला, तर ब्राम्हण आपल्या कार्यालयात धावतपळत येईलच ते दुरुस्त करून घ्यायला."
"ते तर खरंच" सचिव म्हणाले. "पण तो तुमच्यासारखा सभ्यपणे बोलणार नाही."
गुरुजींनी सचिवाकडे चमकून बघितले. दोन वर्षांपुर्वी आणि बहुतेक इतर अनेक वेळा ब्राम्हणाने कार्यालयात येऊन कसे वर्तन केले असावे ते त्यांच्या पटकन ल्क्षांत आले. ते मिस्किलपणे हसले आणि घरी जाण्यासाठी उठले.