मध्यंतरी जरा बद्धकोष्ठाचा त्रास झाला म्हणून औषधांच्या दुकानात जाऊन एका प्रसिद्ध कंपनीचे औषध आणले.
"२०० मिलि. ची बाटली घेतलीत तर १०६ रुपये पडतील. ४०० मिलि. ची बाटली १४५ रुपयांना मिळेल" असे दुकानदार म्हणाला. फक्त ३९ रुपये जास्त देऊन २१२ रुपयांचे औषध १४५ रुपयांना मिळते म्हटल्यावर साहजिकपणे ४०० मिलि. च्या बाटलीची खरेदी झाली. सहा दिवस नेमाने औषध घेतले, पण गुण काही येईना. असे पूर्वी कधी झाले नव्हते. शेवटी दुकानांत जाऊन २०० मिलि. ची बाटली आणली. काय सांगू, एका दिवसात गुण आला. गुण आल्याचा आनंद काही औरच असतो. बद्धकोष्ठ बरे झाल्यावर जरासे संशोधन केले. तेव्हा शोध लागला की २०० आणि ४०० मिलि. च्या बाटल्यांमधल्या औषधांचे प्रमाण समान होते. मग असे का व्हावे?
मग गूगलवर शोध घेतला, तेव्हा तेथे सापडलेली माहिती तर आणखीनच चक्रावून टाकणारी निघाली.
२०० मिलि. च्या बाटलीची किंमत फक्त २२.९३ रुपये होती, तर ४०० मिलि. च्या बाटलीची किंमत फक्त ९८ रुपये होती.
अनुत्तरीत राहिलेले प्रश्न असे.

- इंटरनेटवर दिलेली किंमत आणि दुकानातील किंमत यांत येव्हढी मोठी तफावत कशी?
- २०० मिलि. च्या बाटलीतील औषध प्रभावी ठरते पण ४०० मिलि. च्या बाटलीतील त्याच प्रमाणात बनविले आहे असे लिहिलेले औषध प्रभावी ठरत नाही याचे कारण काय?
- मोठ्या प्रतिष्ठित कंपनीच्या औषधाची ही गत आहे तर छोट्या कंपनीच्या औषधाची काय गत असेल?
- जर डॉक्टरला असे प्रश्न पडतात आणि त्यांची उत्तरे नसतात, तर डॉक्टर नसणा~या इतर माणसांची काय गत असेल?