काही कामानिमित्त आमच्या मजल्यावरच्यांच्या घरी जाण्याचा योग आला. काम पार पडल्यावर आमच्या सज्जातल्या बागेबद्दल बोलणं सुरू झालं.
"आमच्या सज्जातून तुमच्या बोगनवेली इतक्या छान दिसतात म्हणून सांगू" शेजारी म्हणाले.
"बघू तरी" असं म्हणून मी त्यांच्या सज्जाबाहेर डोकवलो.
गुलाबी, पांढरी आणि अबोली रंगांची बोगनवेलीची आमची फुले आमच्या घरांतून दिसतात त्याहून जास्त सुंदर दिसत होती. सोबतच्या फोटोत आमच्या शेजारांच्या सज्जाखाली लावलेले ग्रिल दिसते आहे, ज्यामुळे बोगनवेली संपूर्णपणे दिसत नाहीयेत. नुसत्या डोळ्यांनी बघताना नजर झाडांवर स्थिरावलेली असल्यामुळे गज द्रुष्टीस जाणवत नव्हते आणि फुलांचे सौंदर्य जास्तच खुलून दिसत होते.
"तुमची फुले बघून आम्ही बाजारांत मिळतील त्या सर्व रंगांच्या बोगबवेली आणून लावल्या आहेत" शेजारी म्हणाले. छोट्याशा हरित क्रांतीची ही सुरुवात तर नव्हे?